Shreya Maskar
मसाला बटाटा बनवण्यासाठी बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
मसाला बटाटा बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग टाकून परतून घ्या.
जिरे तडतडल्यावर हळद आणि लाल तिखट टाकून फोडणी द्या.
यात बटाट्याचे काप मीठ घालून चांगले मिक्स करा.
५-१० मिनिटे मसाला बटाटा शिजवून कोथिंबीरने गार्निश करा.
तुम्ही यात टोमॅटो, कांदा आणि मक्याचे दाणे देखील टाकू शकता.
मसाला बटाट्यावर आलू शेव टाकून गरमागरम चपातीसोबत आस्वाद घ्या.