Manasvi Choudhary
पावसाळ्यात योगा करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मात्र पावसाळ्यात योगा करताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यातील योगा करताना काही चुका करणे टाळा अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे योगा मॅटवर बॅक्टेरिया आणि बुरशी लवकर वाढते. मॅट साफ न करताच त्यावर योगा केल्याने इन्फेक्शन किंवा ॲलर्जी होऊ शकते.
पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढतो. अनेकांचे सांधे अखडतात यामुळे कठिण योगासने करणे टाळावे.
पावसाळ्यात वातावरणात ऑक्सिजनची पातळी कमी-अधिक असू शकते यामुळे जास्त वेळ योगा करू नका.
पावसाळ्यात ओल्या कपड्यांमध्ये योगा करणे टाळावे. ओल्या कपड्यांमुळे थंडी वाजून सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
योगासने झाल्यानंतर शरीराचे तापमान जास्त असताना लगेच फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळावे. .
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.