Monsoon Healthcare Tips : पावसाळ्यात साथींच्या आजारांपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

Shruti Vilas Kadam

वारंवार हात धुणे

बाहेरून आल्यावर, जेवण्यापूर्वी आणि स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय ठेवा.

Monsoon Healthcare Tips : | pintrest

घराभोवती पाणी साचू देऊ नका

डेंग्यू आणि मलेरिया पसरवणारे डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे कुलर, कुंडीतील कुंड्या किंवा घराभोवती कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

Monsoon Healthcare Tips | ai image

वाफा घेणे आणि गुळण्या करणे

जर सर्दी किंवा घसा खवखवण्याची लक्षणे दिसू लागली, तर दिवसातून एकदा वाफ घ्या आणि कोमट पाण्यात थोडे मीठ व हळद घालून गुळण्या करा.

Monsoon Healthcare Tips | pintrest

कपडे व्यवस्थित सुकवणे

पावसाळ्यात दमट वातावरणामुळे कपड्यांना बुरशी किंवा वास येतो. अर्धवट सुकलेले कपडे घातल्याने त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते, म्हणून कपडे पूर्ण सुकवूनच वापरा.

Monsoon Healthcare Tips | pintrest

उकळलेले पाणी प्या

पावसाळ्यात जलजन्य आजारांचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे पाणी नेहमी कमीत कमी १०-१५ मिनिटे चांगले उकळून, कोमट करून प्या.

Monsoon Healthcare Tips | pintrest

आहारामध्ये मसाल्यांचा वापर

रोजच्या जेवणात किंवा काढ्यामध्ये हळद, आले, लसूण, मिरी आणि लवंग यांसारख्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचा वापर करा.

spices in food | pintrest

तुळस आणि गवती चहा

तुळशीची पाने, आले आणि गवती चहा घालून केलेला काढा किंवा चहा घेतल्याने घशातील खवखव आणि सर्दीला आराम मिळतो.

Holy Basil and Lemongrass tea | pintrest

गरम आणि ताजे अन्न

पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, त्यामुळे हलके आणि ताजे अन्न खा. बाहेरचे उघड्यावरील अन्न किंवा स्ट्रीट फूड अजिबात खाऊ नका.

monsoon Healthcare Tips | pintrest

व्हिटॅमिन 'सी'

संत्री, लिंबू, पेरू आणि आवळा यांसारख्या फळांमुळे पांढऱ्या पेशी वाढतात आणि संसर्गाशी लढण्यास मदत होते.

vit c rich foods | pintrest

लक्षणे २ - ३ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

doctor prescription | pintrest
Rava Uttapam Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा