Manasvi Choudhary
पावसाळ्यात भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खाल्ली जातात. फळे आणि भाज्या धुण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर केला जातो.
मिठाच्या पाण्याने भाज्या धुणे हे केवळ स्वच्छता म्हणून नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जातात.
पावसाळ्यात भाज्यांवर किटकनाशके मारतात यामुळे मिठाच्या पाण्याने भाज्या धुतल्याने स्वच्छ होतात.
पावसाळ्यात पालेभाज्यांवर बारीक, हिरव्या रंगाच्या अळ्या असतात. यामुळे मिठाच्या पाण्यात भाजी धुतल्याने हे किडे, अळ्या बाहेर पडतात भाजी स्वच्छ होते.
मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. पावसाळ्याच्या दिवसांत हवेत आणि मातीत ओलावा असल्यामुळे भाज्यांवर बॅक्टेरिया आणि बुरशी वेगाने वाढते म्हणून मिठाच्या पाण्याने भाज्या धुतल्या की स्वच्छता.
पावसाळ्यात भाज्यांनवर चिखल आणि चिकट माती खूप लागलेली असते. साध्या पाण्याने ही माती पूर्णपणे निघत नाही. मिठाच्या पाण्यामुळे ही चिकट लगेच निघते.
१) एका मोठ्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात १ ते २ चमचे मीठ मिक्स करा.
२)नंतर या पाण्यात भाज्या किंवा पालेभाज्या १० ते १५ मिनिटे भिजत ठेवा.
३) भाज्या पाण्यातून काढून पुन्हा एकदा साध्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
येथे दिलेली माहिती ही सामानय ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.