Manasvi Choudhary
कुरडू ही पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे. या भाजीमध्ये लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम हे पौष्टिक घटक असतात.
कुरडूची भाजी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. पचनक्रियेच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी आहारात कुरडूच्या भाजीचे सेवन करणे फायदेशीर आहे.
कुरडूची भाजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. ही भाजी चवदार लागते.
कुरडूची भाजी बनवण्यासाठी कुरडू, मूगडाळ, कांदा, लसूण, हिरवी मिरची, खोबरे, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी कुरडूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा चांगला परतून घ्या.
नंतर या भाजीमध्ये भिजवलेली मुगाची डाळ चांगली परतून घ्या. बारीक चिरलेली कुरडू भाजी मिक्स करा आणि चांगली परतून घ्या. या मिश्रणात ओलं खोबरे मिक्स करा.
भाजी शिजवताना त्यात पाणी घालू नका. वाफेवर भाजी शिजवली तर भाजीची चव आणि त्यातील पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे टिकून राहतात.
भाजीवर झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्या . अशाप्रकारे घरच्या घरी आरोग्यासाठी फायदेशीर असणारी कुरडूच्या भाजीची रेसिपी तयार होईल.