Shreya Maskar
कोकणातील धबधबे त्यांच्या हिरव्यागार, धुक्याने भरलेल्या पावसाळी परिसरासाठी, घनदाट हिरव्यागार वातावरणासाठी आणि मोसमी प्रवाही धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
कोकणात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबे मोठ्या प्रवाहात वाहू लागतात. खळाळणाऱ्या धबधब्यांनी भरलेले हे एक नंदनवन बनते. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
सिंधुदुर्ग येथे वैभववाडीच्या दुर्गम भागात नापणे धबधबा आहे. हा धबधबा वर्षभर प्रवाहित असतो आणि अत्यंत सुंदर दिसतो. नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला 'ग्लास स्कायवॉक' (काचेचा पूल) देखील उभारण्यात आला आहे.
रायगड महाडजवळ नानेमाची धबधबा आहे. एका नैसर्गिक खडकाळ अर्धवर्तुळाकार दरीच्या आत खोलवर लपलेला आहे. ४१० फूट उंचीवरून कोसळणारा हा प्रचंड मोठा धबधबा आहे.
रत्नागिरी येथे सावतकडा हे सुंदर ठिकाण आहे. सवतकडा 'चुनाकोळवण धबधबा' म्हणूनही ओळखला जातो. हिरव्यागार जंगलात हा धबधबा वसलेला आहे. सवतकडा धबधबा अर्धवर्तुळाकार आकारात खाली कोसळतो.
रायगड येथे कुंभे धबधबा वसलेला आहे. माणगाव/पोलादपूर जवळच्या दाट सह्याद्रीच्या कुशीत कुंभे धबधबा लपलेला आहे. पावसाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.
रत्नागिरीत संगमेश्वरजवळ मार्लेश्वर धबधबा वसलेला आहे. मार्लेश्वर धबधब्याजवळ प्राचीन गुफा मंदिर आहे. येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.