Siddhi Hande
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशची इमारत १८८७ रोजी बांधण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेल्यावर तुम्ही तेथील आजूबाजू्च्या या प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या.
बृहन्मुंबई महानपालिकेची इमारत खूप जुनी आहे. ही इमारत पाहण्यासाठी पर्यटक नेहमी येतात.
क्रोफर्ड मार्केट हे शॉपिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कमी किंमतीत मिळतील.
गेट वे ऑफ इंडिया हे ठिकाण खूप सुंदर आहे. येथून तुम्ही बोटीतून अलिबागलादेखील जाऊ शकतात.
गेट वे ऑफ इंडियाच्या समोरच ताज हॉटेल आहे. ताज हॉटेल हे १९०३ साली बांधले आहे.
सीएसएमटी स्टेशनवरुन जवळच मरीन लाइन्स आहे. तुम्ही चर्चगेट स्टेशवरुनदेखील मरीन लाइन्सला जाऊ शकतात.
वानखेडे स्टेडियम हे पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची नेहमी गर्दी असते. येथे आयपीएलच्या मॅच खेळल्या जातात.