Rohini Gudaghe
पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना प्रथमोपचार पेटी सोबत ठेवा.
ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात त्या ठिकाणचं वातावरण पाहून ड्रेसिंग करा. पावसाळ्यात पातळ कपडे घालणं योग्य ठरतं.
फिरायला जाताना वॉटरप्रूफ बॅगचा वापर करायला हवा. त्यामुळं सामान ओलं होणार नाही.
फिरायला जाताना अपेक्षित ठिकाणावरील वातावरणाचा अंदाज घ्या.
पावसाळ्यात फिरण्यासाठी बाहेर पडताना सोबत आवश्यक अन्नपदार्थ ठेवा.
जास्त पाऊस झाल्यास लाईट जाऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात फिरायला जाताना नेहमी पॉवरबँक सोबत बाळगा.
पावसाळ्यात फिरायला जाताना सोबत नेहमी छत्री ठेवा.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.