Monsoon Tips : Houseflies पावसाळ्यात घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी घरी माशा फिरतात? तर करा 'हे' सोप्पे उपाय

Shruti Vilas Kadam

ओलावा आणि दमटपणा

पावसाळ्यात ओलावा आणि दमटपणा वाढतो, जो माश्यांच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठी अनुकूल असतो.

Monsoon Tips : Houseflies | PINTREST

घरात का येतात

पावसाळ्यात सडणारे अन्नपदार्थ, कचरा , साचलेले पाणी यांवर माश्या जगतात, आणि जलद वाढतात. अन्नाच्या शोधात त्या घराकडे वळतात.

Monsoon Tips : Houseflies | PINTREST

दमट हवामान

दमट हवामानामुळे माश्यांची प्रजनन क्षमता वाढते आणि ओला कचरा, साचलेला पाणी याठिकणी अंडी घालतात.

Monsoon Tips : Houseflies | GOOGLE

घरगुती उपाय

सर्वप्रथम अन्नपदार्थ झाकून ठेवा. घराच स्वच्छता ठेवा. कचऱ्याचा डब्बा वेळोवेळी धुवत जा. तरीही माश्या येत असतील तर काही सोप्पे घरगुती उपाय करून माश्या नष्ट करू शकता.

Monsoon Tips : Houseflies | PINTREST

कापूर आणि तमालपत्र

कापूर आणि तमालपत्र एका भांड्यात जाळा, याचा धुर आणि सुगंध घरमाश्यांसाठी असह्य होतो, आणि माश्या कमी होतात.

Monsoon Tips : Houseflies | GOOGLE

व्हिनेगर आणि डिश सोप

एका भांड्यात सफरचंद सायडर व्हिनेगर आणि डिश सोप मिसळा. माश्या त्याकडे आकर्षित होतील आणि त्यात मरून पडतील .

Monsoon Tips : Houseflies | PINTREST

मीठ आणि व्हिनेगरचे पाणी

घरात लादी पुसताना पाण्यात मीठ आणि व्हिनेगर मिसळा. मीठाच्या अँटीबॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे घरात माशा येण्याचे प्रमाण कमी होईल.

Monsoon Tips : Houseflies | PINTREST

लिंबू आणि लवंग

लिंबाच्या तुकड्यांंमध्ये १५ ते २० लवंग टोचा, आणि ते खिडक्यांवर, जेवणाच्या टेबलवर ठेवा, याच्या वासाने माश्या दूर राहतील .

Monsoon Tips : Houseflies | GOOGLE

लिंबू आणि मीठ

१ ली. पाण्यात ४ ते ५ लिंबाचा रस पिळा, त्यात योग्य प्रमाणात मीठ मिसळा. हे पाणी सगळीकडे शिंपडा. यामुळे माश्यांचे प्रमाण कमी होईल.

Monsoon Tips : Houseflies | PINTREST

Snakes During Monsoon : पावसाळ्यात दिवसात घरात साप शिरू नये, म्हणून करा हे सोप्पे ३ उपाय

Snakes During Monsoon | saam tv
येथे क्लिक करा.