Manasvi Choudhary
आंबुशीची भाजी ही पावसाळ्यात मिळणारी औषधी रानभाजी आहे. चवीला आंबट असणाऱ्या या भाजीच्या सेवनाने पचनाच्या समस्या कमी होतात.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही आंबुशीची भाजी बनवू शकता. सोपी रेसिपी आहे.
आंबुशीची भाजी बनवण्यासाठी आंबुशी भाजी, तुरडाळ, मूगडाळ, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लसूण, तेल, हळद, मीठ आणि गूळ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी आंबुशीची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाजीची पाने बारीक चिरून घ्या. एका भांड्यामध्ये तूरडाळ किंवी मूगडाळ दोन्हीपैकी एक डाळ भिजत घाला.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, लसूण, हिरवी मिरची चांगली परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली आंबुशीची पाने मिक्स करा.
भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजी व्यवस्थित शिजवून घ्या. भाजी शिजली की त्यात चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि हळद मिक्स करा.
नंतर या मिश्रणात बारीक किसलेला गूळ मिक्स करा. अशापद्धतीने घरच्या घरी गावरान स्टाईल आंबुशीची भाजी तयार होईल.