Manasvi Choudhary
पावसाळ्यात जंगलात, डोंगरात, रानावनात रानभाज्या उगवतात. या भाज्या औषधी असतात.
रानभाज्यापैकी एक भाजी म्हणजे पाथरीची भाजी. पाथरी भाजी चवीला कडवट असली तरी औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते.
या भाजीच्या सेवनाने गर्भवती महिला, कावीळ, पचनाच्या त्रास असलेल्यांना फायदा होतो.
पाथरीची भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. घरच्या घरी ही भाजी तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता.
भाजी बनवण्यासाठी पाथरीची भाजी, कांदा, तुरडाळ, लसूण, मसाला, मीठ, शेंगदाणा कूट, तेल हे साहित्य घ्या.
सर्वातआधी पाथरी भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्या.
नंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये तुरडाळ आणि पाथरीची भाजी शिजवून घ्या.
भाजी थंड झाल्यानंतर त्यातील पाणी पिळून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामद्ये कांदा परतून घ्या.
नंतर या मिश्रणामध्ये लसूण, मसाला आणि भाजी चांगली परतून घ्या. भाजी परतल्यानंतर यात शेंगदाण्याचा कूट आणि मीठ मिक्स करा.
भाजी चांगली वाफवून घेतल्यानंतर सर्व्हसाठी तयार होईल. अशाप्रकारे गावरान स्टाईल पाथरीची भाजी तयार होईल.