Manasvi Choudhary
भारंगीची भाजी ही पावसाळ्यातच खाल्ली जाते. पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांवर गुणकारी मानली जाते.
भारंगीची भाजी डोंगरउतावरावर, जंगलात आणि नदी किनारी उगवते. या भाजीचे सेवन केल्याने दमा, खोकला, सर्दी, ताप, पोटाच्या समस्या यावर उपाय होतो.
भारंगीची भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. यासाठी तुम्हाला भारंगीची कोवळी पाने, कांदा, मूगडाळ, लसूण, मसाला, गूळ, तेल, हिंग, मोहरी, हळद हे साहित्य घ्यावे लागणार आहे.
सर्वातआधी भारंगीची कोवळी पाने स्वच्छ करा त्याचे देठ काढा आणि धुवून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलात कांदा आणि ठेचलेला लसूण परतून घ्या.
नंतर त्यात मुगडाळ मिक्स करा. बारीक चिरलेली भारंगीची पाने घाला. मिश्रणावर झाकण ठेवून वाफवून घ्या.
नंतर यात मसाला, मीठ, हळद घालून मिश्रण एकजीव करा. भाजी साधारण शिजल्यानंतर त्यात गूळ मिक्स करा आणि भाजी शिजवू द्या. अशाप्रकारे घरच्या घरी भारंगीची भाजी तयार होईल.