Manasvi Choudhary
पावसाळ्यात रानावनात उगवणारी भाजी म्हणजे अळंबी. अळंबी या भाजीचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत.
अळंबी ही अत्यंत चविष्ट आणि प्रथिनयुक्त रानभाजी आहे. ही भाजी बनवण्याची पारंपरिक पद्धत आज जाणून घ्या.
अळंबीची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.
भाजी बनवण्यासाठी अळंबी, कांदा, लसूण, हिरवी मिरची, ओले खोबरे, हळद, मसाला, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी भाजी स्वच्छ करून बारीक चिरून घ्या.
गॅसवर पातेल्यामध्ये गरम तेलात कांदा चांगला खरपूस परतून घ्या. नंतर यात अळंबीची भाजी मिक्स करा.
नंतर या मिश्रणात मसाले मिक्स करा. मिश्रणावर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या.
अशाप्रकारे गरमा गरम अळंबी स्पेशल भाजी तयार होईल.