महागड्या क्रीम्स कशाला? वय वाढलं तरी २१ वर्षांसारखं तरुण दिसाल; 'ही' ६ योगासनं देतील काचेसारखी स्वच्छ त्वचा

Manasvi Choudhary

ग्लोईंग स्किन

ग्लोईंग स्किनसाठी महिला व मुली अनेक महागडी सौंदर्य प्रसाधने वापरतात मात्र यामुळे त्वचा खराब देखील होऊ शकते. त्वचेवर काळे डाग येतात.

Glowing Skin

योगासने

तुम्हाला जर त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो हवा असेल तर तुम्ही घरच्या घरी काही योगासने केल्यास तुम्हाला फायदा होईल.

Glowing Skin Yoga Poses

असा होतो फायदा

योगा केल्याने केवळ शरीराचा व्यायाम होत नाही तर त्वचेचं सौंदर्य देखील खुलते. काही विशिष्ट योगासने आणि प्राणायामामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते जे त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Glowing Skin Yoga Poses

ताडासन

शरीराची ठेवण सुधारण्यासाठी ताडासना हा योगा महत्वाचा आहे. या योगासनामध्ये शरीराचा संपूर्ण तोल सांभाळला जातो शरीराचे रत्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Tadasana | Yandex

पादहस्तासन

पादहस्तासन या योगासनामध्ये हात पायांजवळ ठेवून पुढे वाकवले जातात यामुळे डोके आणि चेहऱ्याकडे होणारा रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळतो.

padahastasana

अधो मुख श्वानासन

अधो मुख श्वानासन या योगासनामध्ये V आकार बनतो ज्यामुळे खांदे, हात आणि पायांचे स्नायू बळकट होतात.

adho mukha svanasana | pinterest

कपालभाती प्राणायाम

कपालभाती हा श्वासोच्छवास सुधारण्याचा व्यायाम आहे. यामध्ये वेगाने श्वास बाहेर सोडला जातो. हा योगा नियमितपणे केल्याने फुप्फुसांची क्षमता सुधारते. ताण कमी होतो.

kapalbhati pranayama | Yandex

पश्चिमोत्तानासन

पश्मिनोत्तानासन या योगासानामुळे पाठीचा कणा, कंबर आणि पायांना ताण मिळतो.

Paschimottanasana | Canva

उत्तानपादासन

उत्तानपादासन या योगासनामध्ये पाठीवर झोपून दोन्ही पाय वर उचलले जातात यामुळे पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो स्नायू मजबूत होतात. पचनसंस्था निरोगी होते.

uttanpadasana

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

next: सिल्की आणि शायनी केसांसाठी महागडे शॅम्पू नाही, केस धुण्याची 'जपानी स्टाईल' पद्धत फॉलो करा

येथे क्लिक करा...