Manasvi Choudhary
जपानी महिला या त्यांच्या नैसर्गिकरित्या रेशमी, मुलायम आणि चमकदार केसांसाठी जगभरात ओळखल्या जातात.
जपानी महिलांच्या केसाचे सौंदर्य हे केवळ महागडे शॅम्पू नाहीतर केसांची योग्यरित्या काळजी घेणे महत्वाचे आहे.
केसांची योग्य स्वच्छता, टाळूची स्वच्छता हे त्यांच्या केसांचे रहस्य आहे. यामुळे केस केवळ स्वच्छच नाही तर आतून निरोगी बनतात.
जर तुमचेही केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत असतील तर तुम्ही जपानी हेअर केअर रूटीन फॉलो करा.
केस धुण्यापूर्वी कोरड्या केसांवर कंघवा फिरवा यामुळे केसांमधील गुंता कमी होते. धूळ आणि प्रदूषणापासून बचाव होतो.
केस धुताना टाळूची स्वच्छता महत्वाची आहे. यामुळे टाळूचा रक्तप्रवाह सुधारतो.
केस धुताना १ ते २ मिनिटे कोमट पाण्यात पूर्णपणे भिजवून घ्या यामुळे टाळूची छिद्रे उघडतात आणि केसांवरील तेलकटपणा आणि घाम निघून जाते. यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
शॅम्पू थेट टाळूवर लावण्याऐवजी शॅम्पूचा फेस करा आणि हळूवारपणे टाळूवर लावा यामुळे थेट केसांवर रासायनिक संपर्क येत नाही.
बोटाने गोलाकार टाळूची हळूवारपणे मालिश करा यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळती देखील कमी होत. कोंडा होत नाही.
शॅम्पू पुर्णपणे धुवून काढणे महत्वाचे आहे. शॅम्पू केसांमध्ये राहिला तर टाळूला खाज सुटणे, चिकटपणा आणि केस गळणे या समस्या उद्भवू शकतात.
कंडिशनर नेहमी केसांचा मधल्या भागात टोकांना लावा, टाळूला लावू नका. धुण्यापूर्वी २ ते ३ मिनिटे केसांवर तसेच ठेवा यामुळे केस मऊ, मुलायम होतात.
केस जोरात घासण्याऐवजी टॉवेलने हलक्या हाताने पुसून घ्या. ओल्या केसांवर जोर लावल्याने केस तुटू शकतात.