Manasvi Choudhary
पावसाळ्यात मिळणारी आरोग्यासाठी गुणकारी असणारी रानभाजी म्हणजे कुड्याच्या फुलां.
कुडा जंगलात नैसर्गिकरित्या आढळणारी औषधी झाड आहे. पावसाळ्यात याला सुंदर पांढरी फुले येतात.
कुड्याच्या फुलां चमचमीत भाजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे.
कुड्याच्या फुलांची भाजी बनवण्यासाठी कुड्याची ताजी फुले, कांदा, लसूण, हिरवी मिरची, ओल्या खोबऱ्याचा किस, मोहरी, हळद मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी कुड्याच्या फुलांची भाजी स्वच्छ धुवून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी आणि लसूण चांगला परतून घ्या. लसूण चांगला परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्या.
मिश्रणात हळद आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
आता धुवून घेतलेली कुड्याच्या फुलांची बारीक चिरलेली भाजी मिश्रणात टाका आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
भाजी वाफेवर शिजवण्यासाठी झाकण ठेवा. भाजी शिजली की त्यात चवीनुसार मीठ आणि ओल्या खोबऱ्याची किस घाला.