Manasvi Choudhary
चहामध्ये साखर की गूळ टाकावा? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. मात्र तुम्हाला माहितीये का? आरोग्यासाठी नेमके काय फायदेशीर आहे
चहामध्ये साखर टाकल्याने शरीराला कोणतीही पौष्टिक तत्व मिळत नाही. यामुळे शरीरातील कॅलरीज वाढू शकते.
नियमितपणे साखरेचा चहा प्यायल्याने वजन वाढण्याची शक्यता असते यामुळे चहाचे प्रमाण योग्य प्रमाणात असते.
साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे डायबिटीसचा धोका वाढतो.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
जेवणानंतर गुळाचा चहा घेतल्यास अन्न पचण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
चहामध्ये गूळ टाकल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.