Manasvi Choudhary
उकडलेले चणे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जातात. काळे चण्यांमध्ये प्रथिनांची मात्रा अधिक असते यामुळे आहारात चण्यांचा समावेश केला जातो.
चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण भरपूर असते यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
उकडलेल्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
चण्यामध्ये फायबरचे प्रमाण असते ज्यामुळे पचनसंस्था सुधारते. तुम्हालाही जर बद्धकोष्ठता , अपचन किंवा पोट साफ न होण्याच्या समस्या उद्भवत असेल तर उकडलेले चणे खा.
चण्यांचालो-ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. त्यामुळे ते पचायला वेळ लागतो आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
चण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
चण्यामध्ये लोहाचे प्रमाण (Iron) भरपूर असते यामुळे ज्या व्यक्तींना अशक्तपणा किंवा रक्ताची कमतर आहे, त्यांनी नियमित उकडलेले चणे खाल्ल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.