शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना विचारा हे 5 प्रश्न

Manasvi Choudhary

मुलांना विचारा प्रश्न

शाळेतून मुलं घरी आल्यानंतर तुम्ही त्यांना आज शाळेत काय झालं? एवढंच न विचारता खालील 5 प्रश्न नक्की विचारा.

Parenting Tips

आजचा शाळेतील तुझा दिवस कसा होता?

आजचा शाळेतील तुझा दिवस कसा होता? हा प्रश्न तुम्ही मुलांना विचारा. याचं उत्तर मुले संपूर्ण वेळ शाळेत कसा घालवला याविषयी तुम्हाला सांगतील. शाळेत त्यांना कोणता तास आवडला, मित्रांसोबत कोणता खेळ खेळताना मजा आली किंवा शिक्षकांनी कोणाचे कौतुक केले, हे ते आनंदाने सांगतील.

Parenting Tips | yandex

शाळेत तुला सर्वात जास्त आनंद का झाला?

शाळेत तुला सर्वात जास्त आनंद का झाला? हा मजेशीर प्रश्न आहे. मात्र याचे उत्तर देताना मुलं तुम्हाला शाळेतील गंमती- जंमती सांगतील यावरून मुले शाळेत किती आनंदी असतात हे लक्षात येईल.

Parenting Tips | Yandex

आज शाळेत तू कोणाला मदत केलीस का?

या प्रश्नामुळे मुलांमध्ये लहानपणापासून मदतीची भावना निर्माण होईल. आपल्यामुळे कोणाला मदत झाली हे तुम्हाला मुले सांगतील.

Parenting Tips | yandex

आज शाळेत असं काय घडलं की ज्यामुळे तुला आश्चर्य वाटले?

आज शाळेत असं काय घडलं की ज्यामुळे तुला आश्चर्य वाटले? हा प्रश्न मुलांची विचार करण्याची क्षमता वाढवतो. शाळेत घडलेल्या एखाद्या नवीन गोष्टीबद्दल किंवा त्यांना न समजलेल्या गोष्टीबद्दल ते तुमच्याशी मोकळेपणाने चर्चा करू शकतात.

parenting tips | canva

आज शाळेत कोणती गोष्ट सगळ्यात कठीण किंवा कंटाळवाणी वाटली?

दिवसभरातील चांगल्या गोष्टींसोबतच त्यांच्या त्रासावर किंवा अडचणींवरही बोलणे गरजेचे आहे. जर त्यांना एखादा विषय समजला नसेल, शिक्षकांचे ओरडणे झाले असेल किंवा मित्रांसोबत काही वाद झाला असेल, तर मुले न घाबरता तुम्हाला सांगतील. यामुळे तुम्हाला त्यांच्या समस्या वेळीच समजून घेता येतील.

Parenting Tips | Canva

NEXT: फक्त प्रेमच नाही, महिलांना नवऱ्याकडून हव्या असतात 'या' 5 गोष्टी

Relationship Tips
येथे क्लिक करा..