Manasvi Choudhary
पावसाळ्यात गरमा गरम चटपटीत पदार्थ खाण्याची मज्जा वेगळीच असते. तुम्हाला देखील काही तरी नवीन ट्राय करायचे असेल तर तुम्ही टोमॅटो चीज चटणी पकोडा ही रेसिपी ट्राय करा.
टोमॅटो चीज चटणी पकोडा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता.
टोमॅटो, चीज, बेसन, तांदळाचे पीठ, धनापावडर, लाल मसाला, ओवा, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, हिरवी मिरची, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
रेसिपी बनवण्यासाठी सर्वातआधी टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या. त्याचे बारीक काप करा आणि त्यातील बिया काढून घ्या.
टोमॅटोच्या या कापांमध्ये चीज स्लाईस चे तुकडे करून भरा
एका भांड्यात बेसन पीठ,तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद,गरम मसाला, चिमूटभर हिंग, पेस्ट, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा.
मिश्रणात पाणी मिक्स करून त्यात पीठ भजून घ्या. टोमॅटोचे स्लाईस एका प्लेटमध्ये घ्या. चीज, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर आणि मीठ टाका.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये टोमॅटोचे स्लाईस पिठात घोळवून तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगयेईपर्यंत चांगले फ्राय करा.