Manasvi Choudhary
पावसाळ्यात पचनक्रिया आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी गरमा गरम सूपचे सेवन करा.
पावसाळ्यात पालकचे सूप तुम्ही पिऊ शकता. सूप बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पालकचे सूप बनवण्यासाठी पालक, कॉर्न फ्लोअर, लसूण, काळी मिरी पावडर, आलं, तूप, गाजर हे साहित्य घ्या.
सूप बनवण्यासाठी पालक स्वच्छ निवडून धुवून घ्या. नंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घ्या.
उकळलेल्या पाण्यामध्ये त्यात हिरवा वटाणा आणि गाजरचे तुकडे शिजवून घ्या. मिक्सरमध्ये पालकची बारीक पेस्ट करा. गॅसवर कढईमध्ये तूप टाका नंतर त्यात कॉर्नफ्लोअर परतून घ्या. त्यात आलं लसणाची पेस्ट मिक्स करा.
नंतर मिश्रणात हिरवे वटाणे आणि गाजर मिक्स करा. पालक पेस्ट मिक्स करून नंतर त्यात चवीनुसार मीठ मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी पालक सूप रेसिपी तयार होईल.