Siddhi Hande
नाश्त्याला रोज काय बनवायचा हा प्रश्न महिलांना पडलेला असतो.
तुम्ही चटपटीत पॅटीस बनवू शकतात. हे पॅटीस खूप चविष्ट आहे.
पॅटीस बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकडून घ्या.
त्यानंतर एका भांड्यात उकडलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, जिरे-धना पावडर, गरम मसाला टाकावा.
त्यानंतर वरुन कोथिंबीर आणि मीठ घालावे.
यानंतर या मिश्रणाचे गोलाकार पॅटीस बनवून घ्या.
त्यानंतर एका प्लेटमध्ये ब्रेड बारीक करुन घ्या.
दुसऱ्या वाटीत कॉर्नफ्लोअर टाका. त्यात थोडे पाणी टाका.
त्यानंतर पॅटीस सर्वात आधी कॉर्नफ्लोअरमध्ये बुडवून घ्या. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये छान घोळवून घ्या.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात पॅटीस तळून घ्या.