Dhanshri Shintre
उपवासात चविष्ठ पर्याय म्हणून फलाहारी आलू टिक्कीला खूप मागणी असते आणि ती सहज तयार करता येते.
उपवासाच्या दिवशी नेहमीची खिचडी किंवा बटाटा-जिरे खाण्याऐवजी स्वादिष्ट फलाहारी आलू टिक्की करून खा आणि चवीनं काहीतरी वेगळं अनुभवायला मिळवा.
जर तुम्हाला उपवासात काहीतरी वेगळं हवं असेल, तर ही सोपी पद्धत वापरून फलाहारी आलू टिक्की बनवा.
बटाटे उकडून मॅश केलेले, दाण्याचा कूट, लाल तिखट, मिरची वाटलेली, मीठ, कोथिंबीर, जीरे, साबुदाण्याचे पीठ, तेल
दोन बटाटे कुकरमध्ये शिजवून थंड करा आणि नंतर किसणीने किसा, टिक्की तयार करण्यासाठी वापरा.
दोन चमचे दाण्याचं कूट, थोडं तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्या.
बाइंडिंगसाठी मिक्सरमध्ये वाटलेलं दोन चमचे साबुदाण्याचं पीठ घालून घट्ट गोळा तयार करा आणि मळून घ्या.
छोट्या टिक्क्या तयार करून त्या पुन्हा एकदा साबुदाण्याच्या पीठात घोळवा, ज्यामुळे टिक्की कुरकुरीत आणि घट्ट होईल.
नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल टाकून आलू टिक्की दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलो फ्राय करून तयार करा.
गरमागरम आलू टिक्की दही आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा, उपवासात खास स्वादाचा अनुभव घेता येईल.
NEXT: रोज नाश्त्याला पोहे खाऊन वैतागलात? मग कुरकुरीत डोश्याची झटपट रेसिपी नोट करा