पावसाळ्यात प्या हेल्दी कॉर्न सूप; चवीसह आरोग्यासाठी फायदेशीर

Manasvi Choudhary

सूप

पावसाळ्यात गरमा गरम सूप पिण्याची मज्जा काहीशी वेगळीच असते. त्यात कॉर्न सूप असेल तर आरोग्यासाठीही फायदा होतो.

Monsoon Special Corn Soup

साहित्य

कॉर्न सूप बनवण्यासाठी कॉर्न दाणे, गाजर, सिमला मिरची, कोबी, तेल, बटर, लसूण, काळी मिरी पावडर, साखर हे साहित्य घ्या.

Corn | pinterest

भाज्या बारीक चिरून घ्या

कॉर्न सूप बनवण्यासाठी सर्वातआधी गाजर, सिमला मिरची, कोबी या भाज्या बारीक चिरून घ्या.

Chopped Vegetable | yandex

मिश्रण परतून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बटर टाका. बटर विरघळले की त्यात लसूण परतून घ्या त्यानंतर त्यात कॉर्न दाणे टाका आणि चांगले परतून घ्या.

Fodni

पेस्ट तयार करा

कॉर्न चांगले परतून घेतल्यानंतर त्यातील थोडे कॉर्नची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा.

corn

भाज्या परतून घ्या

गॅसवर कढईमध्ये पुन्हा बारीक चिरलेली कोबी, सिमला, गाजर आणि कॉर्नची पेस्ट मिक्स करून मिश्रण चांगले परतून घ्या.

Monsoon Special Corn Soup

मसाले मिक्स करा

सूपच्या या मिश्रणात काळे मिरी पावडर, साखर, मीठ घालून चांगले उकळून घ्या. नंतर यात १ चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स करा.

spices

कॉर्न सूप तयार

मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर गरमा गरम कॉर्न सूप तयार होईल.

Monsoon Special Corn Soup

NEXT: पावसाळ्यात नक्की खा 'या' ६ गावरान भाज्या; चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Monsoon vegetables
येथे क्लिक करा...