Monsoon Special Food : पावसाळ्यात घरी झटपट अशी बनवा वांग्याची भजी

Shruti Vilas Kadam

गरम गरम भज्यांची चटक

पावसाळा सुरू झाला की चटक लागते ती गरमागरम भज्यांची, बाहेर पडणारा पाऊस, हातात चहा आणि गरम भज्यांची प्लेट, कांदा भजी नेहमीच खातो, पण एकदा वांग्याची भजी नक्की ट्राय करा.

kandabhaji | saam tv marathi

साहित्य

आवडीनुसार वांगी, बेसन, तांदळाचे पीठ, मसाले, चिमुटभर हिंग, ओवा, मीठ, तेल

brinjal pakoda ingredients | saam tv marathi

वांगी कापणे

वांगी स्वच्छ धुवून घ्या, गोल पातळ काप करून काही वेळा मीठच्या पाण्यात ठेवा, जेणे करून ती काळी पडणार नाहीत.

Brinjal Pakoda Recipe | saam tv marathi

पीठात सर्व साहित्य एकजीव करा.

एका वाडग्यातल बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, ओवा, हिंग, चवीनुसार मीठ आणि मिश्रणात थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करा.

Brinjal Pakoda Recipe | saam tv marathi

मिक्स करताना काळजी घ्या

मिश्रण मध्यम घट्ट असावे, पीठाच्या गुठल्या उरणार नाहीत याची काळजी घ्यावी.

Brinjal Pakoda Recipe | saam tv marathi

भजी तळणे

तेल गरम झाल्यावर वांग्याचे काप मिश्रणात बुडवून गरम तेलात सोडा.

Brinjal Pakoda fry | saam tv marathi

मध्यम आचेवर तळा

भजीला दोन्ही बाजूंनी खरपूस रंग येईपर्यंत तळा. आणि कुरकुरीत भज्यांचा आस्वाद घ्या

Brinjal Pakoda fry | saam tv marathi

सर्व्ह करा

गरम चहा, ब्लॅक कॉफी, पुदीना कोथिंबीरीची चटणी, टोमॅटो सॉस किंवा लसणाच्या चटणीसोबत तुम्ही सर्व्ह करू शकता.

Brinjal Pakoda Recipe | saam tv marathi

पावसाळ्यात प्या गरमागरम स्वीट कॉर्न सूप हॉटेलसारखी चव येण्यासाठी ही रेसिपी वाचा

Sweet Corn Soup Recipe | saam tv marathi
येथे क्लिक करा