Manasvi Choudhary
पावसाळा म्हटलं की रानभाज्यांची सीझन सुरू होते. बाजारात सर्वत्र रानभाज्या दिसतात.
अनेकांना रानभाज्या माहित नाही. परंतू रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यांचे सेवन केले पाहिजे.
दिंड्याची रानभाजी ही अत्यच चविष्ट लागते. पावसाळ्यात रानवनात, शेतात ही भाजी उगवते.
दिंड्याची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही भाजी बनवू शकता.
भाजी बनवण्यासाठी दिंडा भाजी, चणा डाळ, कांदा, लसूण, आले- लसूण पेस्ट, जिरे मोहरी, हिंग, हळद,मसाला, गूळ, कोकम, ओलं खोबरं, तेल हे साहित्य घ्या.
भाजी बनवताना सर्वप्रथम दिंड्याच्या भाजीचे देठ सोलून घ्या.त्याचे दोरे काढा. भाजीचे बारीक तुकडे करा. भाजी बारीक चिरून घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग याची फोडणी द्या. नंतर या फोडणीमध्ये लसूण, हळद, मसाला आणि भिजवलेली चणाडाळ मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यात बारीक चिरलेली दिंड्याची भाजी परतून घ्या. भाजी शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवा. ही भाजी वाफेवर शिजवा. अशाप्रकारे घरच्या घरी गावरान स्टाईल चमचमीत दिड्यांची भाजी तयार होईल.