Tanvi Pol
पहिल्यांदा फणसाच्या सोललेल्या बिया उकडून घ्याव्यात.
थोडं तेल गरम करून त्यात लसूण, लाल मिरच्या परतून घ्या.
त्यात उकडलेल्या बिया, थोडं खोबरं आणि मीठ घाला.
सर्व साहित्य मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून वाटून घ्यावे.
गरज असल्यास थोडं लिंबाचा रस किंवा चिंच घालू शकता.
चवीनुसार गोडसर चव हवी असल्यास थोडं गूळ घालावा.
चटणी थोडी झणझणीत आणि गोडसर लागते.