Manasvi Choudhary
क्रिस्पी केळीचे वडे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तु्म्ही घरीच ही रेसिपी ट्राय करू शकता.
क्रिस्पी केळीचे वडे बनवण्यासाठी पिकलेली केळी, गव्हाचे पीठ, रवा, गूळ, जायफळ पावडर, तीळ, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
केळीचे वडे बनवण्यासाठी सर्वातआधी केळी सोलून घ्या व ती स्मॅश करा. त्यानंतर त्यात गूळाचा कीस करून मिक्स करा.
नंतर त्यात रवा,तीळ, जायफळ पावडर,गव्हाचे पीठ थोडे मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
मिक्स केलेले पीठ रात्रभर चांगले फेटून घ्या नंतर गॅसवर कढईवर गरम तेलामध्ये या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून फ्राय करा.
वड्यांना सोनेरी रंग येईपर्यंत चांगले फ्राय करून घ्या म्हणजे मस्त टेस्टी गरमागरम वडे तयार होतील.