रिमझिम पावसात नाश्त्याला बनवा गरमा गरम ब्रेड पकोडा, नोट करा सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

नाश्ता

रोजच नाश्त्याला काय बनवावे, असा प्रश्न महिलांना पडतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्पी रेसिपी सांगणार आहोत.

Breakfast Time | Saam tv

ब्रेड पकोडा

ब्रेड पकोडा हा सोपा आणि चविष्ट पदार्थ आहे. सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही कुरकुरीत ब्रेड पकोडा बनवू शकता.

Bread Pakoda Recipe | Saam tv

साहित्य

ब्रेड पकोडा रेसिपी बनवण्यासाठी ब्रेड स्लाईस, बटाटे, बेसन, तांदळाचे पीठ, हळद, जिरे, खायचा सोडा, मीठ आणि तेल हे साहित्य घ्या.

Bread | Saam tv

बटाटा भाजी तयार करा

पकोडा बनवण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी गॅसवर कुकरमध्ये बटाटे शिजूवन घ्यायचे आहे. बटाटे शिजल्यानंतर कढईमध्ये गरम तेलात जिरे, मोहरी आणि हळद घालून त्यात बटाटे मिक्स करून फोडणी द्या.

Potato Bhaji Recipe | Saam tv

बेसन आणि तांदूळ पीठ एकत्र करा

एका भांड्यात बेसन आणि तांदूळ पीठ मिक्स करा. त्यात पीठामध्ये थोडे पाणी घाला.

Besan | yandex

ही काळजी घ्या

पीठ जास्त घट्ट आणि पीठ पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Bread Pakoda Recipe

ब्रेड स्लाईसमध्ये भाजी पसरवा

या मिश्रणात खाण्याचा सोडा आणि मीठ मिक्स करा. ब्रेड स्लाईच्या कढा काढा नंतर ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर भाजी पसरवा नंतर त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा.

Bread | yandex

ब्रेड पकोडा फ्राय करा

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये तयार ब्रेड पकोडा सोनेरी रंग होईपर्यत दोन्ही बाजूंनी फ्राय करा. अशाप्रकारे घरच्या घरी ब्रेड पकोडा तयार होईल.

Bread Pakoda Recipe

NEXT: Easy Breakfast Recipe: रोज तोच उपमा-शिरा खाऊन कंटाळलात? अवघ्या १० मिनिटांत बनवा 'ही' झटपट आणि पौष्टिक रेसिपी!

येथे क्लिक करा...