Manasvi Choudhary
सकाळचा नाश्ता काय करावा हा प्रश्न अनेक महिलांना पडतो. नेहमीच शिरा- उपमा खाऊन तुम्ही देखील कंटाळात असाल तर नवीन रेसिपी आज ट्राय करा.
थालीपीठ तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता. ही झटपट होणारी चविष्ट रेसिपी आहे.
थालीपीठ बनवण्यासाठी तुम्हाला पोहे, ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन,कांदा, आलं, हिरवीमिरची पेस्ट, पांढरे तीळ, कोथिंबीर, मीठ, तेल, हळद हे साहित्य घ्या.
सर्वातआधी एका मोठ्या भांड्यामध्ये पोहे भिजत घाला. नंतर ते पोहे मळून घ्या.
पोह्यांच्या मिश्रणामध्ये ज्वारी, गव्हाचे पीठ आणि बेसन मिक्स करा.
या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची पेस्ट, आलं- लसूण पेस्ट, हळद, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर,मीठ हे साहित्य मिक्स करा.
मिश्रणात तेल आणि पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर कॉटनच्या सुती कापड पाण्यात भिजवून पोळपाटावर पसरवून घ्या.
या कापडमध्ये थालीपीठ थापून मधोमध एक छिद्र करा. गॅसवर पॅनवर तेल किंवा तूप घालून थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे. अशाप्रकारे घरच्या घरी थालीपीठ तयार होईल.