Monsoon Special Bhel : पावसाळ्यात घरी बनवा चटकदार गावरान भेळ

Shreya Maskar

मुसळधार पाऊस

मुसळधार पावसात चटकदार,चमचमीत भेळ खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

heavy rain | Yandex

चटपटीत भेळ

भेळ चाट हा अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे.

Spicy bhel | Yandex

मटकी भेळ

रोजच्या आहारातील मटकीचा वापर करून आपण गावरान मटकी भेळ तयार करू शकतो.

Matki Bhel | Yandex

पावसात

पावसात बाहेरची भेळ खाण्यापेक्षा घरीच चमचमीत मटकी भेळ बनवा.

in the rain | Yandex

मटकी भेळ बनवण्यासाठी साहित्य

मटकी भेळ बनवण्यासाठी तेल, मोड आलेली मटकी, हळद, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर, लसूण, चाट मसाला, कांदा, टोमॅटो , हिरव्या मिरचीचा ठेचा इत्यादी साहित्य लागते.

Ingredients for making Matki Bhel | Yandex

फरसाण

फरसाणमध्ये तुम्ही कुरमुरे, पापडी, पिवळी शेव, खारी बुंदी , शेंगदाणे इत्यादी पदार्थ वापरा.

Farsan | Yandex

मटकी वाफवून घ्या

मटकी भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोड आलेली मटकी, हळद आणि चवीनुसार मीठ घालून छान वाफवून घ्या.

Steam matki | Yandex

सर्व पदार्थ एकत्र करा

एका भांड्यात कुरमुरे, पापडी, पिवळी शेव, फरसाण, खारी बुंदी , शेंगदाणे तसेच आवडीनुसार इतर पदार्थ टाकून छान एकत्र करून घ्या.

Combine all ingredients | Yandex

बारीक चिरलेला कांदा

आता या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो , लसूण टाका.

Finely chopped onion | Yandex

कोथिंबीरने सज‌वा

सर्वात शेवटी यामध्ये लिंबाचा रस, चाट मसाला, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर घालून सर्व छान एकत्र करून घ्या.

Garnish with coriander | Yandex

चहासोबत भेळचा आस्वाद

पावसात गरमागरम चहासोबत झणझणीत भेळचा आस्वाद घ्या.

Bhel flavor with tea | Yandex

NEXT : पावसाळ्यात भजी खाऊन कंटाळलाय? असे बनवा कच्च्या तांदळाचे कुरकुरीत पकोडे

Pakoda | Saam Tv