Shreya Maskar
कोबीचे कटलेट बनवण्यासाठी कोबी, खोबरं, चिंच, कांदा, तांदळाचे पीठ, रवा आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि आलं इत्यादी मसाले लागतात.
कोबीचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी व्यवस्थित बारीक किसून घ्या.
मीठ घालून कोबीतील जास्त पाणी बाहेर काढा.
मिक्सरच्या भांड्यात खोबरं, आले, चिंच, लाल मिरची पावडर, हळदी, धने पावडर आणि जिरे पावडर घालून पेस्ट वाटून घ्या.
किसलेल्या कोबीमध्ये कांदा, वाटलेला मसाला, कोथिंबीर, तांदळाचे पीठ घालून चांगले एकजीव करा.
कोबीच्या मिश्रणाचे छान कटलेट्स करून रव्यामध्ये घोळवून तेलात गोल्डन फ्राय करा.
गरमागरम चहासोबत कोबीच्या कुरकुरीत कटलेट्सचा आस्वाद घ्या.