Shreya Maskar
लेमन स्क्रब बनवण्यासाठी साखर, लिंबाची साल, कोकनट पावडर, खोबऱ्याचे तेल, बॉडी वॉश आणि थेंब लेमन इसेन्शियल ऑइल इत्यादी साहित्य लागते.
लेमन स्क्रब बनवण्यासाठी प्रथम साखर बारीक वाटून घ्या. त्याची पावडर झाल्यावर, ती एका बाऊलमध्ये काढा.
आता बाऊलमध्ये किसलेली लिंबाची साल, कोकनट पावडर, बॉडी वॉश आणि इसेन्शियल ऑइल मिक्स करा. सर्व मिक्स करून फेस स्क्रब तयार झाला आहे.
फेस स्क्रब वापरण्यासाठी ओल्या त्वचेवर स्क्रब लावा आणि २-३ मिनिटे गोलाकार गतीने हलक्या हाताने मसाज करा. विशेषतः चेहऱ्यासोबतच कोपर, गुडघे आणि पाय यांसारख्या खडबडीत भागांवर देखील लावा. येथे जास्त काळेपणा असतो.
व्यवस्थित मसाज केल्यानंतर, स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्वचा हलक्या हाताने पुसून कोरडी करा. सर्वोत्तम परिणामांसाठी हा स्क्रब आठवड्यातून १-२ वेळा वापरा.
लेमन स्क्रब काळवंडलेली त्वचा, चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स-मुरुमांचे डाग घालवण्यास फायदेशीर ठरते. त्वचेला पोषण मिळते. त्वचेच्या मृत पेशी हळुवारपणे काढून टाकतो.
स्क्रबच्या लिंबाच्या सुगंधामुळे स्पासारखा अनुभव मिळतो. त्वचेला ताजेपणा आणि निरोगी चमक देते. तसेच फक्त ५ रुपयांत पार्लरसारखा ग्लो चेहऱ्यावर येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.