Manasvi Choudhary
सध्या धो-धो पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यात आरोग्यासह दमट वातावरणामुळे त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे.
त्वचेवर खाज येणे, पुरळ येणे, त्वचा लाल होणे यासारंख्या समस्या पावसाळ्यात वाढतात. पावसाळ्यात त्वचेवर अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते.
दमट वातावरणामुळे चेहर्यावर, हाता- पायांना, मानेवर खाज येते, बारीक बारीक पुरळ येण्याच्या समस्या अधिक उद्भवतात. यावर आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घ्या.
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. कोरफडमधील घटक त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करते. पावसाळ्यात अॅलर्जी, जळजळ आणि खाज येत कोरफडीचा गर गुलाबपाण्यात मिक्स करून लावू शकता.
नारळ तेलामधील जिवाणूनाशक गुणधर्म त्वचेच्या समस्यांसाठी प्रभावी आहेत. त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने त्वचेवरील कोरडेपणा कमी करते त्वचेचा ph लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत करते. खोबरेल तेलात कापूर मिक्स करून तुम्ही त्वचेवर लावा.
कडुलिंबाची पाने औषधी गुणधर्मासाठी ओळखली जातात. कडुलिंबामधील जिवानूनाशक गुणधर्म त्वचेची खाज आण जळजळ कमी करते. तुम्हाला देखील पावसाळ्यात त्वचेच्या समस्या उद्भवत असतील तर तुम्ही कडुलिंबाची पाने वाटून त्याची पेस्ट लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.