Monsoon Skin Care : महागड्या क्रीमची गरज नाही, पावसाळ्यात 'या' फेसपॅकने गायब होतील चेहऱ्यावरील काळे डाग

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात हवेतील जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण आणि त्वचेवर साचणारे प्रदूषक घटक यांच्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात.

rainy season | pinterest

काळे डाग

हवेतील ओलाव्यामुळे घाम आणि त्वचेतील तेलाचे (सीबम) प्रमाण वाढते, ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात आणि वारंवार मुरुमे येतात. ही मुरुमे बरी झाल्यावर अनेकदा तिथे काळे डाग राहतात.

black spots | pinterest

चेहऱ्यावरील काळे डाग कसे घालवायचे?

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी लिंबू हा रामबाण उपाय आहे. जो त्वचा स्वच्छ करण्यास आणि डाग हलके करण्यास मदत करतो. तुम्ही चेहऱ्याला लिंबू-गुळाचा फेसपॅक लावा.

How to get rid of black spots on the face? | pinterest

गूळातील पोषक घटक

गुळातील नैसर्गिक ग्लायकोलिक ऍसिडमुळे काळे डाग कमी होतात, जे एक सौम्य एक्सफोलिएंट म्हणून मृत त्वचेच्या पेशी विरघळवते आणि हायपरपिगमेंटेशन कमी करते.

jaggery | pinterest

फेसपॅक कसा बनवावा?

लिंबू-गुळाचा फेसपॅक बनवण्यासाठी गुळाचा एक लहान तुकडा बारीक किसून घ्या. यात ताज्या लिंबाच्या रसाचे ४-५ थेंब घाला. जास्त लिंबू घालू नका, कारण त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.

How to make facepack? | pinterest

लिंबू-गूळ

मिश्रण मिक्स करून एक घट्ट पण गुळगुळीत पेस्ट बनवा. तयार फेसपॅक चेहऱ्याला लावून १५-२० मिनिटे ठेवून द्या.

Lemon | pinterest

फेसपॅक किती वेळा लावावा?

त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि त्यावर मॉइश्चराइजर लावा. आठवड्यातून असे १-२ वेळा केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील.

How often should facepack be applied? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : विड्याचं पान त्वचेसाठी वरदान; 'असा' करा वापर, उन्हानं काळवंडलेला चेहरा नव्याने चमकेल

Summer Skin Care | saam tv
येथे क्लिक करा...