Manasvi Choudhary
पावसाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. यंदा पावसाळ्यात तुम्ही देखील पिकनीकचा प्लान करत असाल तर मुंबईपासून अगदी जवळ असणाऱ्या ठिकाणांना भेट द्या.
मुंबईच्या आसपास अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत जेथे तुम्ही एक दिवसाच्या पिकनीसाठी खास जाऊ शकता.
ठाण्यामध्ये येऊर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील थंड वातावरण मनाला मोहिनी घालते.
मुंबईपासून जवळच दोन ते तीन तासांच्या अंतरावर चिंचोटी धबधबा आहे. अनेक पर्यटक पावसाळ्यात येथे जातात.
माथेरान येथे गेल्यानंतर हिरव्यागार टेकड्यांमधून येणारा पाऊस आणि दाट धुकं अनुभवण्यासाठी तुम्ही खास भेट द्या.
माथेरान कुशीत वसलेलं भिवपुरी येथे तुम्ही भेट द्या येथे गेल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही धबधब्याखाली मनसोक्त आनंद लुटा.
नवी मुंबईमध्ये खारघर येथे पांडवकडा धबधबा प्रसिद्ध आहे. ठाणे आणि नवी मुंबई पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केद्रबिंदू आहे.