Shruti Vilas Kadam
रेयॉनचे कुर्ते हलके, मऊ आणि लवकर सुकणारे असतात. त्यामुळे दमट वातावरणातही दिवसभर आरामदायी वाटते.
लिनेन-ब्लेंड फॅब्रिक हवेशीर असते आणि शरीराला थंडावा देते. मात्र शुद्ध लिनेनपेक्षा ब्लेंडेड लिनेन अधिक सोयीचे ठरते.
ऑफिस किंवा पार्टीसाठी जॉर्जेट आणि क्रेप फॅब्रिकचे कुर्ते चांगले ठरतात. हे लवकर सुकतात आणि सुरकुत्याही कमी पडतात.
डेनिम किंवा जाड कापडाचे कुर्ते पावसाळ्यात ओले झाल्यानंतर खूप वेळ सुकत नाहीत. त्यामुळे अशा फॅब्रिकपासून दूर राहणे योग्य.
पावसाळ्यात चिखलाचे डाग सहज दिसू नयेत म्हणून नेव्ही ब्लू, हिरवा, मरून, काळा किंवा गडद राखाडी रंगाचे कुर्ते निवडावेत.
खूप टाइट कपड्यांपेक्षा सैल आणि आरामदायी फिटिंगचे कुर्ते निवडल्यास हवा खेळती राहते, घाम कमी होतो आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी होतो.
पॉलिस्टरसारखे पूर्ण सिंथेटिक कापड लवकर सुकते, मात्र ते घाम शोषत नाही. त्यामुळे जास्त वेळ परिधान केल्यास त्वचेवर पुरळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ब्लेंडेड फॅब्रिक हा अधिक चांगला पर्याय ठरतो.