Satara Tourism: पावसाळा आला आता बॅग भरा आणि निघा; साताऱ्याजवळच्या ४ ठिकाणी या विकेंडला करा प्लान

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील डोंगररांगा हिरवाईने बहरून जातात. धुके, ढग आणि रिमझिम पाऊस यामुळे परिसर अधिक आकर्षक दिसतो.

Satara tourist places | saam tv

विकेंड ट्रिपसाठी सातारा उत्तम पर्याय

मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसारख्या शहरांमधून साताऱ्यात सहज पोहोचता येतं. दोन दिवसांच्या छोट्या सहलीसाठी अनेक पर्यटनस्थळं उपलब्ध आहेत. शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे विकेंड अधिक संस्मरणीय बनतो.

Mahabaleshwar monsoon travel | saam tv

पावसाळ्यात पर्यटनाला वाढते पसंती

पावसाळा सुरू होताच साताऱ्यात पर्यटकांची संख्या वाढू लागते. धबधबे, तलाव आणि घाट परिसर पाहण्यासाठी अनेक जण येतात. थंड हवामानामुळे प्रवासाचा आनंद आणखी वाढतो.

Ambenali Waterfall | saam tv

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. पावसाळ्यात याठिकाणच्या दऱ्या, डोंगर आणि पॉइंट्स धुक्याने वेढलेले दिसतात. आर्थर सीट, एलिफंट्स हेड आणि लिंगमळा परिसरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.

Dhom Dam tourism | saam tv

आंबेनळी धबधबा

आंबेनळी घाट वॉटरफॉल हा पावसाळ्यात वाहणारा धबधबा आहे. आंबेनळी घाटातील वळणदार रस्त्यांसह या धबधब्याचं दृश्य अत्यंत मनमोहक दिसतं. पावसाच्या दिवसांत याठिकाणी धुकं आणि हिरवाळ छान दिसते.

Satara weekend trip | saam tv

धोम धरण

धोम घरण हे कृष्णा नदीवरील महत्त्वाचं धरण आहे. पावसाळ्यात धरणाचा जलसाठा वाढल्याने परिसर अधिक नयनरम्य दिसतो. धरणाच्या बॅकवॉटरमधून दिसणारे डोंगर आणि हिरवाई पर्यटकांना आकर्षित करतात.

Satara sightseeing | saam tv

वेण्णा लेक

वेण्णा लेक हे महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात तलावाभोवतीचं वातावरण धुक्यानं आणि हिरवाईने भरून जातं. तलाव परिसरात फिरताना पर्यटकांना शांतता आणि निसर्गाचा सुंदर अनुभव मिळतो.

Satara travel guide | saam tv

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

High Cholesterol | saam tv
येथे क्लिक करा