Shruti Vilas Kadam
ताडासनामुळे शरीराचा तोल सुधारतो, पाठीचा कणा मजबूत राहतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होते. दिवसाची सुरुवात करण्यासाठी हे उत्तम योगासन आहे.
भुजंगासनामुळे छाती खुलते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि श्वसनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. पावसाळ्यात हे आसन विशेष फायदेशीर ठरते.
जेवणानंतर ५ ते १० मिनिटे वज्रासन केल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन, गॅस आणि पोट फुगण्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत मिळते.
हे आसन शरीराची लवचिकता वाढवते, स्नायूंना बळकट करते आणि रक्ताभिसरण सुधारते. नियमित सरावामुळे शरीर अधिक तंदुरुस्त राहते.
सेतूबंधासनामुळे पाठ, मान आणि खांद्यावरील ताण कमी होतो. तसेच फुफ्फुसांना चांगला व्यायाम मिळून श्वसनक्रिया सुधारण्यास मदत होते.
हा प्राणायाम फुफ्फुसांचे आरोग्य सुधारतो, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो.
कपालभातीमुळे श्वसनमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील ऊर्जा वाढते, तणाव कमी होतो आणि एकूण आरोग्य सुधारते.