Alisha Khedekar
पावसाळ्यात मूग, मसूर आणि हरभरा यांसारखी कडधान्ये खाल्ल्याने शरीराला प्रथिने आणि ऊर्जा मिळते.
पालेभाज्यांमध्ये जंतू असू शकतात, त्यामुळे त्या नीट धुवून आणि शिजवूनच खाणे सुरक्षित ठरते.
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये पोषणमूल्य वाढते आणि पचनासाठीही त्या अधिक फायदेशीर ठरतात.
योग्य प्रमाणात शिजवलेली कडधान्ये पचन सुधारण्यास आणि शरीराची ताकद वाढवण्यास मदत करतात.
स्थानिक आणि हंगामी पालेभाज्या ताज्या असल्याने त्यांमधील पोषक घटक अधिक प्रमाणात मिळतात.
कडधान्यांची उसळ किंवा सूप पावसाळ्यात उबदार आणि पौष्टिक आहाराचा उत्तम पर्याय ठरतो.
पावसाळ्यात कच्च्या पालेभाज्या खाण्यापेक्षा त्या शिजवून खाल्ल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.