Foot Care In Monsoon : पावसाचे घाणेरडे पाणी पायांसाठी धोकादायक, उद्भवेल 'ही' गंभीर समस्या

Shreya Maskar

पावसाळा

मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, महत्त्वाचे म्हणजे पायांची योग्य निघा राखा, कारण पावसाच्या पाण्यामुळे पायाला गंभीर समस्या उद्भवू शकतात. संसर्गाचा धोका वाढतो.

rainy season | google

इमर्शन फूट सिंड्रोम (ट्रेंच फूट)

इमर्शन फूट सिंड्रोम पाय जास्त वेळ ओले आणि थंड ठेवल्यामुळे होतो. यामुळे सुन्नपणा, तीव्र वेदना, सूज येते आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत मज्जातंतूंचे नुकसान होते.

Immersion foot syndrome | google

ॲथलीट फूट (टिनिया पेडिस)

ॲथलीट फूट हा एक अत्यंत संसर्गजन्य बुरशीजन्य संसर्ग आहे, ज्यामुळे खाज सुटते, त्वचा सोलते, बोटांमधील त्वचा पांढरी आणि ओलसर होते आणि जळजळ होते.

Athlete's Foot | google

सेल्युलायटिस आणि जिवाणूजन्य संसर्ग

घाणेरड्या, साचलेल्या पावसाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जिवाणू असतात. जर पायांवरील लहान ओरखड्यांमधून आत शिरते, ज्यामुळे पायाला लालसरपणा, उष्णता, वेदना आणि पू होऊ शकतो.

Cellulitis and bacterial infection | google

पाय धुवा

पावसातून घरी आल्यावर ताबडतोब पाय स्वच्छ साबणाने धुवा आणि कोरडे करा. तुम्ही पाय धुवण्यासाठी कोमट पाणी वापरा. बोटांमधील जागा कोरडी राहील याची खात्री करा.

Wash your feet | pinterest

मोजे आणि बूट बदला

पावसाळ्यात कधीही ओलसर मोजे किंवा बूट घालू नका. बाहेरून आल्यावर चप्पल पूर्ण कोरड्या करा आणि मगच दुसऱ्या वेळी घाला.

Change socks and shoes | pinterest

पावसाळी चप्पल

पावसाळ्यात वॉटरप्रूफ, मजबूत ग्रीप असणारी आणि लवकर सुकणारी चप्पल खरेदी करावी. लेदर किंवा फॅब्रिकऐवजी रबर, पीव्हीसी किंवा ईव्हीए मटेरियलची चप्पल सर्वोत्तम मानली जाते.

Rain slippers | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : अंगदुखी असो वा ताप; वारंवार पेनकिलर खाताय? वेळीच थांबा! अन्यथा जीवावर बेतू शकतं

Painkiller Side Effects | pinterest
येथे क्लिक करा...