Monsoon Health Care: पावसाळ्यात आजारी पडायचं नाही? मग हे पदार्थ पुढचे तीन महिने खाणं टाळा

Shruti Vilas Kadam

रस्त्यावरील उघडे अन्न टाळा

पावसाळ्यात उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये जंतू आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात.

monsoon health tips

कच्च्या पालेभाज्या आणि सॅलड कमी खा

या काळात पालेभाज्यांमध्ये माती, जंतू आणि कीटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या नीट धुवून किंवा शिजवूनच खाव्यात.

chole salad | yandex

तळलेले आणि तेलकट पदार्थ टाळा

भजी, वडे, समोसे यांसारखे पदार्थ चविष्ट असले तरी ते पचनावर ताण आणतात आणि अॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास वाढवू शकतात.

Fried Rice Recipe | Google

कापून ठेवलेली फळे खाऊ नका

बाहेर कापून ठेवलेल्या फळांमध्ये जंतू वाढू शकतात. नेहमी ताजी आणि स्वतः सोलून खाल्लेले फळच खाणे योग्य.

Mix Fruit

समुद्री खाद्यपदार्थ कमी खा

पावसाळा हा अनेक माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात काही समुद्री खाद्यपदार्थ दूषित असण्याची शक्यता वाढते.

fish | yandex

थंड पेये आणि आईस्क्रीम टाळा

अतिथंड पदार्थांमुळे घसा दुखणे, सर्दी आणि खोकल्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे कोमट किंवा गरम पेये पिणे अधिक फायदेशीर ठरते.

Ice Cream | pinterest

शिळे आणि पुन्हा गरम केलेले अन्न खाऊ नका

पावसाळ्यात अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. शिळ्या अन्नामध्ये जीवाणू वाढू शकतात, त्यामुळे नेहमी ताजे आणि स्वच्छ अन्नच खावे.

homemade food | saam

Motichur Laddu Recipe: घरी असलेल्या कार्यक्रमासाठी झटपट बनवा मऊ, रसाळ मोतीचूर लाडू; वाचा सोपी रेसिपी

Motichoor Ladoo recipe | Google
येथे क्लिक करा