ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
विशेषतः पावसाळ्यात, फक्त मुलांनीच नाही तर सर्वांनी बाहेरचे अन्न खाणे बंद करावे. हे आजाराचे सर्वात मोठे कारण आहे.
मुलं पावसात भिजून आल्यानंतर त्यांना ताबडतोब सुकलेले कपडे घाला.
पावसाळ्यात संपूर्ण कुटुंबाने कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करावी.
तुळस, आलं, मध, लिंबू इत्यादी पदार्थांचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा.
मच्छरदाणी किंवा मच्छर प्रतिबंधक क्रीम वापरा, आणि डासांपासून दूर राहा.
घरात घाणेरडे पाणी साचू देऊ नका. बाथरूम आणि बाल्कनी देखील कोरडी ठेवा.
पावसाळ्यात पाणी उकळून थंड करुन प्या.