Manasvi Choudhary
पावसाळ्यात हवेतील ओलावा, गारवा आणि बदलत्या वातावरणामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो.
डिहायड्रेशन, शरीरातील पाण्याची कमतरता, मेंदूतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे ही डोकेदुखी होण्याची मुख्य लक्षणे आहेत.
डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोपे उपाय करू शकता. ते कोणते हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पावसाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसातून चार ते पाच लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.
आल्यामधील वेदनाशामक गुणधर्म डोकेदुखीवर त्वरित काम करतात. आल्याचे कोमट पाणी तुम्ही डोकेदुखीवर प्या तुम्हाला बरे दिसेल.
डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी पुरेशी झोप घ्या. अपुऱ्या झोपेमुळे डोक्यावर ताण येतो आणि डोकेदुखी वाढते
पावसाळ्याच्या दिवसात हेअर ऑइलने केसांची हाताच्या बोटांनी मसाज करा तुम्हाला शांत वाटेल.
पुदिन्याच्या पानांचा रस काढून तो कपाळावर लावा किंवा पुदिन्याचे तेलाने कपाळावर हलकी मॉलिश करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.