Manasvi Choudhary
पाऊस आणि गरमा गरम पकोडे हे समीकरण सर्वानाच माहित आहे. पावसाळ्यात गरमा गरम चहासोबत भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते.
मात्र अनेक फिटनेसप्रेमी तेलकट पदार्थ खाणे टाळतात. तेलामध्ये तळलेले पकोडे खात नाहीत. यासाठी आज आम्ही तुम्हाला तेलाच एकही थेंब न वापरता भजी कशी बनवू शकता या विषयी सांगणार आहोत.
आजकाल अनेक पदार्थ हे एअर फ्रायरवर बनवले जातात. मात्र तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही कुकरचा वापर करू शकता.
कुकरमध्ये तेलाचा वापर न करता तुम्ही पकोडे रेसिपी बनवा. सर्वातआधी पकोडे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये बेसन, मीठ, हळद, लाल मिरची, गरम मसाला, कोथिंबीर, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा हे मिश्रण एकत्र करा.
मिश्रणात पाणी घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट करू नका. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
पकोडे बनवण्यासाठी आता प्रेशर कुकरमध्ये पांढरे मीठ पसरवा. कुकरची शिट्टी काढून झाकण बंद करू नका. फक्त हलकेसे कुकरवर ठेवा जेणेकरून कुकर आतून गरम होईल.
एका भांड्याला तेल लावा त्यात पकोड्याचे मिश्रण मिक्स करा. कुकरमध्ये स्टँडवर मिश्रणाचे भांडे ठेवा आणि झाकण बंद करा.
गॅसवर साधारण ५ मिनिटे हे मिश्रण शिजवून घ्या. त्यानंत भांडे बाजूला करून पकोड्याचे मिश्रण एका ताटलीत काढा. या मिश्रणाचे छोटे छोटे तुकडे करा. अशा प्रकारे घरच्या घरी तेलाचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी भजी तयार करू शकता.