Shruti Vilas Kadam
पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने केस धुवा आणि पूर्णपणे कोरडे करा. ओले केस ठेवले तर बुरशी आणि कोंड्याचा त्रास वाढू शकतो.
पावसाळ्यात घाम आणि धूळ केसांमध्ये जास्त साचते. त्यामुळे आठवड्यातून २ ते ३ वेळा सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.
आठवड्यातून एक-दोन वेळा नारळ, बदाम किंवा आवळ्याच्या तेलाने हलका मसाज केल्यास टाळूला पोषण मिळते आणि केस मजबूत राहण्यास मदत होते.
शॅम्पूनंतर कंडिशनर वापरल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो, गुंता कमी होतो आणि केस अधिक मऊ व चमकदार दिसतात.
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लरचा वारंवार वापर केल्याने केस अधिक कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात.
ओलसर वातावरणात जंतू आणि बुरशी वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे कंगवा, टॉवेल आणि उशीचे कव्हर नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
याशिवाय आठवड्यातून एक वेळा ताज्या कोरफडीचा सर केसांना लावा आणि ३० मिनिटांना केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसातील कोंडा कमी करण्यास आणि केस मऊ सिल्की होण्यास मदत होते.