ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात लोक त्यांच्या त्वचेची आणि केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
बऱ्याचदा पावसात केस भिजल्यामुळे केसांना चिवट वास येतो. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.
केसांमधून येणारा वास दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि पुदिन्यापासून बनवलेला हेअर पॅक लावू शकता.
तुम्ही केसांना फक्त दही लावूनही हा वास दूर करु शकता. तसेच केस सॉफ्ट देखील होतील.
दही आणि दालचिनीची पेस्ट बनवून केसांना लावा. यामुळे केसांतील चिवटपणा दूर होतो.
अॅप्पल सायडर व्हिनेगरने केस धुतल्याने देखील केसांतील चिवट वास दूर होतो.
पावसात केस भिजल्यावर केसांना कोरफडीचे जेल लावा,यामुळे वास निघून जाईल आणि केस सॉफ्ट होतील.