ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही हे सिंपल ॲक्टिव्हिटी करु शकता.
कोणतीही नवीन भाषा, वाद्य किंवा कौशल्य शिका.यामुळे मेंदूमध्ये न्यूरल कनेक्शन बनते, जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.
शब्दकोडे, सूडोकू किंवा लॉजिक पजल्स सोडवा. समस्या सोडवणे आणि पॅटर्न ओळखणे हे एकाग्रता वाढवण्यास मदत करतात.
दररोज दोन नवीन शब्द शिका. यामुळे मेंदूला चालना मिळते आणि कार्यक्षमता वाढते.
साल्सा, जुम्बा किंवा कोणतेही नवीन डान्स फॉर्म शिका. डान्समुळे मेंदूच्या कार्यक्षमतेला गती आणि एकाग्रता वाढवते. तसेच यामुळे मूड देखील सुधारतो.
तुमचे आवडते संगीत ऐका यामुळे मन शांत होते. संगीत ऐकल्याने स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य सुधारते.
दररोज ३० ते ४० मिनिटे योगा किंवा जिम करा. यामुळे मेंदूला रक्त आणि ऑक्सिजन प्रवाह वाढतो.