ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नारळ पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे, यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, अमीनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व असतात.
नारळ पाणी प्यायल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नये, जाणून घ्या.
नारळ पाणी प्यायल्यानंतर जास्त मीठ असलेले पदार्थांचे सेवन करु नये.
नारळ पाणी प्यायल्यानंतर शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते, यानंतर जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळा. नाहीतर पोट फुगीची समस्या होऊ शकते.
नारळ पाणीचे सेवन केल्यानंतर आंबट फळं खाणं टाळा. संत्री आणि लिंबू खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
दहीमध्ये लॅक्टिक अॅसिड असते, म्हणून नारळ पाणी प्यायल्यानंतर लगेच दही खाऊ नका.
नारळ पाणी प्यायल्यानंतर थंड पदार्थ खाणं टाळा, अन्यथा सर्दी- खोकला सारखे आजार होऊ शकतात.