Manasvi Choudhary
पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात केस गळण्याची समस्या दिवसेंदिवस वाढते. दमट वातावरण आणि हवेतील ओलावा यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.
पावसाळ्यात केस केवळ चांगल्या शाम्पूने धुतले म्हणजे केस चांगले राहिले असं होत नाही. केसांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला त्यांची योग्यप्रकारे काळजी घेणे महत्वाचे आहे.
अनेकांना केस मोकळे ठेवायला आवडतात तर, काहींना ते बांधलेले जास्त आवडतात यासाठी पावसाळ्यात केस बांधावे की मोकळे ठेवावे असा प्रश्न निर्माण होत आहे.
केस उघडे ठेवल्याने तुटण्याची, गळण्याची समस्या वाढू शकते. म्हणून केस बांधून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
पावसाळ्यात हवेतील बदलामुळे टाळूला जास्त घाम येतो, टाळू तेलकट होतो यामुळे केस मोकळे ठेवल्यास केसांमध्ये धूळ, प्रदूषण वाढू शकते
दमट हवेमुळे केसांमधील मॉइश्चर निघून जाते आणि केस कोरडे होतात . मोकळे केस एकमेकांत जास्त गुंता होऊन तुटतात.
पावसाच्या पाण्याने मोकळे केस लवकर ओले होतात यामुळे टाळूवर बुरशीजन्य संसर्ग, कोंडा आणि खाज येण्याची समस्या वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.